Poem by my grandma

काय हवे तुझ काय हवे, सांग लाडके तुझ काय हवे|
हिरवा शालू, चोळी हिरवी की, अलंकार पाचूचे हिरवे|नव्या युगाची, नव्या पिढीची, आधुनिक मी माता|
काय हवे मज सांगे तुम्हा, संकोच मुली न करता|

कितीक आशा, कितीक स्वप्ने, मनी उठविती नाद|
मर्म जाणोनी मम बाळाने, द्यावा प्रतिसाद|

वाटे मजला चकोरापरी, चांदणे पिउनी घ्यावे|
मम बलाने करीत रहावे, शीतालतेचे शिडकावे|

वनी, उपवनी, रानी फिरुनी, पुष्पगंध मी हुंगावा|
निःश्वासाची सुमने उधळून, परिमल पसरावा|

उंच उंच मी झोके घ्यावे, होऊन बेभान|
जमिनीवरच्या वास्तवतेचे पण सुटू न द्यावे भान|

सागरतीरी बसुनी ऐकते, गंभीर त्याची गाज|
प्रगल्भ बुद्धीवर चढवावा, साखोळ द्यानाचा साज|

संगीतश्रवणी तल्लीन होता, भरून येतो ऊर्|
लयतालाच्या मेळी मिळावा, जीवनातला सूर|

सर्वांगाने परिपूर्ण घडावे, लोभस व्यक्तिमत्व|
सफल होता यत्न माझे, धन्य होईल मातृत्व|

नम्र होऊनी, वडिलांचारणी, मस्तक मी ठेवी|
आशीर्वादाच्या फाळणी ओटी भरून जावी|

This one is written by my grandmother for my Dohale Jevan. For those who don’t know it, it’s a maharashtrian traditional function held for a pregnant woman, similar to a baby shower.

Advertisements

2 thoughts on “Poem by my grandma

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s